राज्यात ‘एच३ एन २’चे चार नवे रुग्ण

राज्यात ‘एच३ एन २’चे चार नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राज्यामध्ये रविवारी (ता. २) ‘एच३ एन२’च्या चार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘एच३ एन२’ च्या रुग्णांची संख्या ३६५ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात दिवसेंदिवस एच३ एन२ आणि एच१ एन१ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १ जानेवारीपासून आतापर्यंत इन्फ्ल्युएंझाचे ३ लाख ५८ हजार ७३ संशयित रुग्ण सापडले असून त्यांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. यामध्ये ‘एच १ एन१’ चे ४५१ तर ‘एच३ एन२’चे ३६५ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

इन्फ्ल्युएंझा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, तसेच रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तिथे आवश्यक औषधोपचार व साधनसामुग्रीचा साठा ठेवण्यात आला असून राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com