महिला कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी

महिला कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी

मुंबई, ता. १२ : स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्‍या प्रकरणांना आळा घालण्यासाठी एम वॉर्डमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केले होते. शंभरहून अधिक पालिका महिला कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमांतर्गत स्त्रीरोगतडज्ज्ञ आणि कर्करोगतज्ज्ञ (कॅन्सोलॉजिस्ट) यांच्या उपस्थितीत विविध संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात डॉक्टरांनी उपस्थित महिलांना स्तनांचे स्वतः परीक्षण करण्याचे प्रात्यक्षिकही दिले. या शिबिराचे उद्दिष्ट महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार करणे तसेच त्याविषयी जागरूकता निर्माण करणे, हे होते. या वेळी ३० ते ५७ वयोगटातील २३ मॅमोग्राफी आणि २१ पॅप स्मीअरद्वारे स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी महिलांची तपासणी करण्यात आली. चेंबूरच्या झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाने हे शिबिर आयोजित केले होते.

लवकर निदान महत्त्वाचे
स्तन आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग सामान्यत: सर्वच वयोगटातील स्त्रियांमध्ये दिसून येतो. सध्या देशभरात चिंताजनक दराने ही प्रकरणे वाढत आहेत. स्त्रिया स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रमुख लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. या कर्करोगांमुळे उच्च मृत्युदर आणि विकृती दर आहेत. महिलांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी लवकर निदान महत्त्वाचे आहे, असे मत या वेळी तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले.

महिला अनेकदा त्यांच्या व्यग्र जीवशैलामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात आजाराने पुढील टप्पा गाठल्‍यावर ते डॉक्टरांशी संपर्क साधतात ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते. त्‍यामुळे महिलांनी वेळीच तपासणी करायला हवी.
– डॉ. अद्वैत गोरे, वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com