राज्यात कोरोनाचे १११५ नवे रुग्ण

राज्यात कोरोनाचे १११५ नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना बुधवारी १११५ नवीन रुग्ण आढळले; तर ९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. राज्याप्रमाणे मुंबईतही बुधवारी कोरोनाचे ३२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या १.८२ टक्के आहे. आज ५६० रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे; तर राज्यात सक्रिय ५४२१ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच मुंबईतही आजघडीला १५७७ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

सध्याच्या कोविडसंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार डिसेंबरपासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविडबाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात येत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत विमानतळांवर एकूण १७,९७,५३९ प्रवासी दाखल झाले. त्यात ४०,२५० प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये ६७ जणांचे नमुने आरटीपीसीआर आणि जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com