मुंबईत उद्यापासून दोन दिवसीय युवा संसद

मुंबईत उद्यापासून दोन दिवसीय युवा संसद

मुंबई, ता. १७ ः तरुणांमध्ये लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील ७८ विद्यार्थी १८ आणि १९ एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठात होणाऱ्या राज्य युवा संसद २०२३ या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये राज्यभरातून निवडून आलेले २७ प्रतिनिधी काम करतील. हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि युनिसेफ यांनी आयोजित केला आहे. एनएसएसशी संलग्नित १० विद्यापीठांमधील ७८ मतदारांमध्ये २७ पदांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये ५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणुकीचे महत्त्व समजावे म्हणून ही प्रक्रिया मुक्त वातावरणात आणि निष्पक्षपणे पार पडली. निवडक सदस्यांसह निवडून आलेले प्रतिनिधी आता १९ एप्रिल रोजी युवा संसदेत प्रश्न मांडतील, समस्यांचे निराकरण करतील आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर चर्चाही करतील. दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांच्याशी १८ एप्रिल रोजी राज भवन येथे विद्यार्थी लोकशाही आणि युवकांच्या सहभागावर संवाद साधणार आहेत. तसेच सर्व विद्यार्थी राज्य विधानसभा आणि परिषद सभागृहांना भेट देऊन कामकाज जाणून घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com