राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई, ता. १७ : गोरेगावच्या पत्रा चाळ गैरव्यवहारात आरोपी असलेले खासदार संजय राऊत यांच्यासह सर्व आरोपींनी ता. १० मे रोजी न्यायालयात हजर राहावे, असे आदेश विशेष न्यायालयाने आज दिले.
मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने राऊत, त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, विकसक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आज यावर न्यायालयात सुनावणी झाली. वाधवान बंधूंना याबाबत अद्याप कारागृहात हजर केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना याबाबत निर्देश दिले आहेत. आजच्या सुनावणीला राऊत न्यायालयात हजर होते; मात्र कारागृहातून वाधवान बंधू हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने १० मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले. ईडीने उच्च न्यायालयात राऊत यांच्या जामिनाविरोधात याचिका केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होऊ शकली नाही. पुढील सुनावणी २५ एप्रिलला होणार आहे. राऊत सध्या जामिनावर असून या जामिनाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पत्रा चाळ गैरव्यवहार राऊत यांच्यामार्फत घडवण्यात आला, असा दावा ईडीने केला आहे; मात्र विशेष न्यायालयाने जामीन मंजूर करताना निकालपत्रात तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com