राज्यात ५४५ नवे रुग्ण

राज्यात ५४५ नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यात रविवारी ५४५ रुग्णांची नोंद झाली असून, आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्‍या ८१, ६१, ८९४ एवढी झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८०,०७,३३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, राज्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६८,९३,७०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१, ६१,८९४ (०९.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले.
रविवारी राज्यात ८२७८ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ५५४० सरकारी प्रयोगशाळेत तर २६१६ खासगी प्रयोगशाळेत तर १२२ सेल्फ टेस्ट झाल्या असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यात एक्बीबी १.१६ व्हेरिएंटचे ७८९ रुग्ण सापडले असून त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ जानेवारीपासून आजपर्यंत ८६ कोरोना रुग्‍णाचा मृत्यू झाला. यापैकी ७२.०९ टक्के रुग्ण साठ वर्षांवरील, ८४ टक्के सहबाधित तर १३ टक्के रुग्ण सहबाधित नसल्याचे सांगण्यात आले.
राज्यात २२ एप्रिलपर्यंत ६१६७ रुग्ण सक्रिय असून, ५८६६ म्हणजे ९५.१ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर ३०१ म्हणजे ४.९ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २४४ रुग्ण साधारण वॉर्डात उपचार घेत असून, ५७ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. अहवालानुसार १५ ते २१ एप्रिल या आठवड्यात ६ हजार ५५ रुग्ण आढळून आले आहेत.

९४ रुग्णांची आरटीपीसीआर जीनोम चाचणी
राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत १९, ५६, ५६५ एवढे प्रवासी आले असून, यातील ४४,१९४ प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर ९४ जणांचे नमुने जिनोमसाठी पाठविण्यात आले.

मुंबईत १४१ नवे रुग्ण
मुंबईत रविवारी १४१ रुग्ण आढळले असून, आता मुंबईतील रुग्णांची संख्या ११,६०,९६४ एवढी झाली आहे. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून १९,७६१ एवढी मृत्यूची संख्या झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com