राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

मुंबई, ता. ३० : एका खासगी टेलिग्राम संकेतस्थळावर हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाल्याच्या प्रकरणानंतर आज राज्य लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वांत मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेत कोणत्याही प्रकारे विद्यार्थी आणि त्यांच्यासंदर्भातील त्रुटी राहिल्या नसल्याने ही परीक्षा राज्यभरात सुरळीत झाली असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.
आयोगामार्फत आज ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरिता एकूण ४ लाख ६७ हजार ८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील एकूण १ हजार ४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८० टक्के उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागांतील एकूण ८ हजार १६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्यादेखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com