आठवलेंनी पाचव्यांदा ‘सीम्बा’ दत्तक घेतला

आठवलेंनी पाचव्यांदा ‘सीम्बा’ दत्तक घेतला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजनेंतर्गत सलग पाचव्या वर्षी आठवले यांनी त्यांचे सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते एक लाख २० हजार रुपये वार्षिक शुल्क अदा करून त्यास दत्तक घेतले.
दलित पँथरपासून पँथर ही ओळख असणारे नेते रामदास आठवले यांचे पँथर या वन्यजीवावर प्रेम आहे. ते एकेकाळी दलित पँथरमध्ये सक्रिय होते, त्यामुळे त्यांचे पँथरवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सलग पाचव्या वर्षी पँथर दत्तक घेतला. निसर्गातील अन्नसाखळीमध्ये समतोल राखण्यात पँथर बिबळ्या वाघ महत्त्वाची भूमिका पार पाडतो. निसर्गाचे आपण काही देणे लागतो, या विचारातून आपण पँथर दत्तक घेतला असून ज्यांना शक्य आहे त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन आठवले यांनी केले. या वेळी त्यांच्या पत्नी सीमा आठवले उपस्थित होत्या.
...
वाढदिवसाचा केक कापला!
वनसंरक्षक आणि संचालक एस. मल्लिकार्जुन यांच्या हस्ते बिबळ्या वाघ दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र रामदास आठवले यांना सुपूर्द करण्यात आले. या दत्तक बिबळ्या वाघाचे नाव सिम्बा ठेवण्यात आले असून त्याचा पाचवा वाढदिवस आज केक कापून आणि बुद्धवंदना घेऊन साजरा करण्यात आला. या वेळी रिपाइंचे दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड, हरिहर यादव, युवा नेते तेजस दिलीप व्हावळे, कांता पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com