टीबी रुग्णांना मिळणार मांसाहारी आहार

टीबी रुग्णांना मिळणार मांसाहारी आहार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई महापालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयात प्रथमच रुग्णांना उच्च-प्रथिने आहार पर्याय म्हणून मांसाहारी अन्न देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णाला चांगले प्रथिनेयुक्त जेवण देऊन आजार बरा होण्यास फायदा होणार आहे.
२०१४ मध्ये महापालिकेने ७५० खाटांच्या शिवडी टीबी रुग्णालयातील रुग्णांसाठी जेवण तयार करण्याचे कंत्राट इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन)ला दिले होते. दरम्यान, आवश्यक पोषण, प्रथिने, लसूण आणि आले यांचा अभाव नेहमीच रुग्णांना जाणवत होता. त्यामुळे नगरसेवकांनी आहारात मांसाहाराचा समावेश करावा, अशा अनेक मागण्या केल्या होत्या. यासंदर्भातील प्रस्ताव सीपीडी विभागाकडे पाठवण्यात आला होता. याचा खर्च जवळपास दहा कोटींवर जात होता. तसेच वाढत्या महागाईनुसार या दरात बदल करून रकमेचा अंदाजित खर्च पाठवण्यात आला आहे. सीपीडीकडे हा प्रस्ताव गेल्यावर याबाबत कमी दर असलेल्या कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यात येणार आहे. तसेच यात मांसाहाराचादेखील समावेश करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली आहे.

------------------
लवकरच निविदा निघणार
यापूर्वी कंत्राट असलेल्या इस्कॉनकडून मांसाहारास विरोध करण्यात आला आहे. यापूर्वी मांसाहाराचा आहारात समावेश नसताना आता मांसाहाराचा समावेश का करण्यात आला आहे, अशी विचारणा त्यांच्याकडून झाली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सर्व प्रक्रिया ही सीपीडीकडून सुरू असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच १५-२० दिवसांत याची निविदा निघणार आहे. रुग्णांच्या जेवणात आता चिकन, मासे आणि अंड्यांचा समावेश असेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

-------------------
आहारात मिळणार हे पदार्थ
मांसाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहारात चार चपात्या, भात, डाळ, उसळ (सर्व रुग्णांसाठी आठवड्यातून दोनदा) ६० ग्रॅम चिकन असलेली चिकन करी यांचा समावेश असेल. शाकाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहार पनीर/सोया चंक्ससह देण्यात येणार आहे.

-----------------
कमी मसालेदार पदार्थ
महापालिकेने कमी मसालेदार आहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये मऊ-शिजलेली खिचडी, खीर (नाचणी/रवा/दलिया/शेवईपासून बनवलेले) आणि द्रव आहार, ज्यामध्ये भाज्यांचे सूप, नारळ पाणी किंवा डाळ, लापशी (नाचणी/रवा/तांदूळ), ताक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com