‘विनगेम’ ॲपवरील फौजदारी गुन्हा रद्द

‘विनगेम’ ॲपवरील फौजदारी गुन्हा रद्द

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : जुगार खेळण्यासाठी प्रवृत्त करणारा गेम, असा आरोप ठेवून ‘विनगेम’ ॲपवर दाखल केलेला फौजदारी गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. हा खेळ सट्टा प्रकारात नसून कौशल्यावर आधारित आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये विनगेम खेळणाऱ्या सतीश बोटाजी या व्यक्तीला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. संगणकावर काही क्रमांक टाकून हा गेम पैसे घेऊन खेळला जात होता, असा पोलिसांचा आरोप आहे. यावरून पोलिसांनी विनगेम एंटरप्रायझेस आणि चालकांवर गुन्हा दाखल केला. धाड टाकली तेव्हा त्याच्याकडे अधिकृत परवाना नव्हता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने सातारा पोलिसांनी दाखल केलेली फौजदारी तक्रार रद्दबातल करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाचे निरीक्षण
१) विनगेम हा कौशल्याने खेळण्यासारखा खेळ आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे जुगार असल्याचे आढळत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने मांडले. या ॲपमध्ये भूमितीय आणि गणितीय पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे कौशल्याने आणि पद्धतशीरपणे देणे अपेक्षित आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
२) खंडपीठाने या गेमचे माहिती पुस्तक तपासले. यामध्ये दिलेली गणिते समीकरणाच्या माध्यमातून सोडवायची असतात आणि त्यासाठी विशिष्ट पद्धत आणि मर्यादित वेळ असतो. यामध्ये सहज यश मिळत नाही; तर कौशल्याने खेळ खेळावा लागतो. त्यामुळे सट्टा या वर्गात हा खेळ येत नाही, असे खंडपीठाने म्हटले आणि याचिका नामंजूर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com