राज्यभरात नीट परीक्षा सुरळीत

राज्यभरात नीट परीक्षा सुरळीत

मुंबई, ता. ७ : देशातील वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या एमबीबीएससह विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेतली जाणारी नीट यूजी ही सामायिक प्रवेश परीक्षा आज (ता. ७) राज्यभर सुरळीत पार पडली.
मुंबईत मेगाब्लॉक आणि कमी लोकलमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी मोठ्या कसरती कराव्या लागल्या. सकाळी ११ वाजताच अनेकांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागले असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
एनटीएमार्फत नीट या परीक्षेचे नियोजन दुपारी २ ते ५ वाजून २० मिनिटे या कालावधीत करण्यात आले. या परीक्षेसाठी देशातील १८ लाख ७२ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी साधारण साडेसतरा लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असण्याची शक्यता आहे. यंदाची परीक्षा ही मुंबई व पुण्यासह देशातील ४९९ शहरांमध्ये पार पडली; तर परदेशातील १४ परीक्षा केंद्रांवरही परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. देशात एमबीबीएससाठी एक लाख एक हजार १३८, दंतवैद्यकीयसाठी २७ हजार ८६८; तर आयुशअंतर्गत ५२ हजार ७२० जागा आहेत. त्या जागांवर वैद्यकीय प्रवेश समितीनुसार १५ टक्के जागा अखिल भारतीय कोट्यासाठी राखीव असणार आहेत. उर्वरित जागांवर राज्याच्या गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी नीट घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com