कनिष्ठ महाविद्यालयांना हवी शुल्कवाढ

कनिष्ठ महाविद्यालयांना हवी शुल्कवाढ

संजीव भागवत
मुंबई, ता. ८ : मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खासगी कनिष्ठ महाविद्यालयांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात तब्बल १५ ते २० टक्केहून अधिक शुल्कवाढीची मागणी केली आहे. त्यासाठी दोन हजारांहून अधिक महाविद्यालयांनी आपले प्रस्ताव सध्या उपसंचालक कार्यालयात सादर केले आहेत. प्रस्ताव सादर करण्याची ही सुरुवात असल्याने त्यात येत्या काही दिवासांत प्रस्ताव सादर करणाऱ्या महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील एक हजार १६ हून अधिक कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी १५ हजारांपासून ते ८० हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाते. यात कुठेही समानता नाही. शिवाय, या शुल्कासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी तसेच ओबीसी आदी राखीव गटांच्या विद्यार्थ्यांना कोणतीही शुल्कमाफी दिली जात नाही. अनुदानित महाविद्यालयांमध्ये थोडी शुल्कसवलत असली तरी त्यातही इतर मार्गांनी शुल्कवसुली केली जात असून त्यावरही कोणतेच नियंत्रण नसल्याने मोठ्या प्रमाणात शुल्कवसुली सुरू आहे; तर ११ वी प्रवेशाच्या शुल्कासाठी एज्युकेशनल इन्टिट्यूशनल कॅपिटेशन फी ॲक्ट १९८७ लागू आहे; मात्र त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते.

----------------
मागील तीन वर्षांपासून ऑडिटच नाही
११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाचे ऑडिट हे प्रत्येक वर्षी होणे आवश्यक आहे; मात्र संस्थाचालकांच्या दबावामुळे अनेक नामवंत संस्थांमध्ये प्रवेशाची अनागोंदी होऊनही त्यांची चौकशी आणि पुढे प्रवेशाचे ऑडिटही होत नाही. त्यामुळे संस्थाचालक मोकाट सुटले असल्यानेच त्यांना अधिक आर्थिक लाभासाठी पुन्हा शुल्कवाढ हवी असल्याने प्रस्ताव दाखल केले जात आहेत.

------------------
संभाव्य वेळापत्रक जाहीर
दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांतच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक आणि त्याची कार्यवाही सुरू होते. त्यानुसार सोमवारी (ता. ८) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्राचा समावेश आहे. त्यानुसार १ जूनपासून या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याची म्हणजेच भाग-१ची नोंदणी विद्यार्थ्यांना करता येईल. त्यासाठी २२ मे पासून अकरावी प्रवेशासंबंधी हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. १५ मेपासून मदत कक्षही स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com