अनधिकृत शाळावरील कारवाई रखडली, शाळा पुन्हा मोकाळ

अनधिकृत शाळावरील कारवाई रखडली, शाळा पुन्हा मोकाळ

अनधिकृत शाळांवरील कारवाई रखडली

मुंबई, ता. १० : मुंबईसह राज्यात कोणत्याही प्रकारची मान्यता न घेता सुरू असलेल्या अनधिकृत शाळांवरील कारवाई रखडली आहे. काही शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर आता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने मुंबई-पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांना अभय दिले जात आहे काय, असा सवाल पालक संघटनांकडून केला जात आहे.

मागील आठवड्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या ४८६ अनधिकृत शाळांची तपासणी करून त्या तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याच दरम्यान धारावीतील एका इंग्रजी शाळेविरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर अनेक शाळा सुरू असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे पालक संघटनांचे म्हणणे आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अनधिकृत शाळांवर तातडीने कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यात मुंबईतील २३०, ठाणे ११९, रायगड आठ आणि पालघरमधील १२६ शाळा आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, दंडाची रक्कम जमा न केल्यास त्यांच्या ७/१२ वर बोजा चढवावा, त्या शाळांवर आवश्यकतेप्रमाणे गुन्हे नोंदवावेत, शाळा बंद कराव्यात इत्यादी आदेश देण्यात आले आहेत.

अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्याचेही आदेश सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आदींना देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com