मुंबईत १७वे अवयवदान

मुंबईत १७वे अवयवदान

मुंबई, ता. २२ : एका ४० वर्षीय व्यक्तीच्या मृत्युपश्चात झालेल्या अवयवदानामुळे एकाला जीवदान मिळाले आहे. मुंबईत १७ वे यशस्वी अवयवदान पार पडले असून यंदा अवयवदान चळवळीला वेग आल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. २१) फोर्टिस रुग्णालयात एका ४० वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या व्यक्तीच्या यकृताचे दान करण्यात आले. या दानामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. हे अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केल्याचे समन्वयकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com