पेटीएम मनीमार्फत बाँडमध्ये गुंतवणूक

पेटीएम मनीमार्फत बाँडमध्ये गुंतवणूक

मुंबई, ता. २३ ः वन ९७ कम्युनिकेशन्स लि.ची उपकंपनी असलेल्या ‘पेटीएम मनी’तर्फे भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एका क्लिकवर सरकारी व अन्य बाँडमध्ये (रोखे) गुंतवणुकीसाठी पेटीएम मनी ॲपमार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. यामार्फत सरकारी, कॉर्पोरेट आणि करमुक्त अशा तीन प्रकारच्या बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल.
१६ दिवसांपासून ते ३९ वर्षांसाठी ही गुंतवणूक असते व त्यावर सात ते सव्वासात टक्के एवढे व्याज मिळते; तर पाच महिने ते १३ वर्षांपर्यंतच्या करमुक्त बाँडमध्ये ५.८ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. खासगी कंपन्यांच्या बाँडवर विशिष्ट परिस्थितीत पंधरा टक्क्यांपर्यंत एकत्रित उत्पन्नही मिळू शकते, असे पेटीएम मनीचे सीईओ वरुण श्रीधर म्हणाले. या ॲपवरून म्युच्युअल फंडात आणि शेअरबाजारातही गुंतवणूक करता येते. या ॲपवर बाँडबाबतची सर्व सविस्तर माहितीही मिळते. त्यायोगे आपल्याला बाँडवरून किती परतावा मिळेल. तसेच दोन्ही शेअरबाजारांमधील किमती, रेटिंग एजन्सीचे क्रेडिट रेटिंग हेदेखील सहजतेने कळेल. पेटीएम मनी ही सेबी नोंदणीकृत ब्रोकर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com