एसटीपीमधील पाण्याची विक्री

एसटीपीमधील पाण्याची विक्री

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२३ : सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) पाण्याची विक्री करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. चेंबूर येथील माहूल एसटीपी केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी विकण्यात पालिकेला यश मिळाले आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून हे पाणी विकत घेण्यात येणार आहे.
चेंबूर येथील माहूलमध्ये पालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. यामध्ये १०.३ दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सद्या या प्रकल्प केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी विकण्याचा निर्णय मलनिस्सारण प्रचालन विभागाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एचपीसीएल कंपनीसोबत पाणी विकण्याचा करार करण्यात आला आहे. एचपीसीएलला एक हजार लिटरसाठी ८.७२ पैसे दर आकारण्यात येणार आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाणार नाही. त्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी या पाण्याचा वापर करता येणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी विकण्याचा निर्णय तरी महापालिकेने घेतला असला तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी पर्जन्य वाहिन्यांच्या माध्यमातून बाहेर सोडले जात होते.
...
तीन वर्षांसाठी दर
सध्या माहूल एसटीपी केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून ऑगस्ट २०२३ पर्यंत काम पूर्ण होणार आहे. नाईक एन्वायरमेंटल इंजिनीयर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पाच वर्षांसाठी देखरेख आणि दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून पाण्याची विक्रीदेखील केली जात आहे. सध्याचे दर हे पुढील तीन वर्षांसाठी कायम राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com