पुतणीवर बलात्कार करणाऱ्यास कारावास

पुतणीवर बलात्कार करणाऱ्यास कारावास

मुंबई, ता. २३ : अहमदाबादहून मुंबईत कामासाठी आलेल्या अल्पवयीन पुतणीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने चौदा वर्षे कारावासाची सजा सुनावली आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय चाचणीत आरोपीची डीएनए चाचणी जुळले नव्हती; मात्र न्यायालयाने मुलीची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
पोलिस फिर्यादीनुसार पीडिता गुजरातमध्ये आजी आजोबांबरोबर राहत होती. त्यांनी एप्रिल २०१६ मध्ये तिला मुंबईमध्ये तिच्या चुलत्याकडे कामासाठी आणि मुंबई पाहण्यासाठी पाठवले होती. आरोपीने तिचा गैरफायदा घेऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. याची माहिती तिने घरात आरोपीच्या पत्नीला दिली होती. तिने मुलीवर विश्वास ठेवला नाही. त्यानंतर ती पुन्हा अहमदाबादला गेली तेव्हा तिने तिच्या आत्याला ही गोष्ट सांगितली. मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता ती गर्भवती असल्याचे आढळले. त्यामुळे तिथे पोलिस फिर्याद दाखल करून तो मुंबईमध्ये वर्ग करण्यात आली. मुलीने बाळाला जन्म दिला; मात्र त्याचे आणि आरोपीचे डीएनए जुळले नाही. त्यामुळे मला नाहक यामध्ये अडकवले असा बचाव आरोपीने केला होता. न्यायालयाने हा बचाव अमान्य केला. पीडितेने वारंवार आपल्या साक्षीमध्ये याची माहिती दिली आहे. त्यामुळे डीएनए जुळत नाही या कारणामुळे आरोप रद्द होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपीला शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com