किल्ले रायगडवर तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

किल्ले रायगडवर तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

मुंबई, ता. २४ : किल्ले रायगड येथे तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी म्हणजेच शुक्रवारी, २ जून रोजी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वी दोन दिवस राज्याभिषेक सोहळा आणि त्यावेळी झालेल्या विविध कार्यक्रमांचे ऐतिहासिक चित्र पुन्हा उभे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडतर्फे सर्व नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच विनायक सावरकर स्मारक मंडळ दादर, दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई, टीम दातेगड, अजिंक्य हायकर्स बदलापूर, आपला कट्टा ऐरोली, युवा मंच कांदिवली, सह्याद्री प्रतिष्ठान आदी संस्थांचा सहभाग राहणार असून रायगडावर हजारो शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. २ जून रोजी पहाटे शिवरायांची पालखी निघून नगारखान्यासमोर ध्वजारोहण होईल. ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांच्या पालखीचा राजसभेत प्रवेश होईल. मुख्य सिंहासन चौथऱ्यावर वेदमंत्र घोषात धार्मिक विधी होऊन महाराजांना ३५० निरनिराळ्या गडांवरील आणि तीर्थक्षेत्रांतून आणलेल्या जलकुंभातून अभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर महाराजांचे सिंहासनारोहण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com