मुंबईतील हवा स्वच्छ

मुंबईतील हवा स्वच्छ

मुंबई, ता. २९ ः मुंबईतील हवा कधी नव्हे इतकी स्वच्छ झाली आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३४ इतका सर्वांत कमी नोंदवला गेला आहे. सर्व परिसरात ‘उत्तम’ हवेची नोंद झाली आहे. एकही परिसर ‘रेड झोन’मध्ये नाही.
सर्वाधिक कमी एक्यूआय बीकेसीमध्ये २५ नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल वरळीमध्ये ३१ एक्यूआयची नोंद झाली आहे. माझगाव ३४, बोरिवली ४१, मालाड ४६ आणि चेंबूरमध्ये ५८ एक्यूआयची नोंद झाली आहे. केवळ चेंबूरमध्ये समाधानकारक हवेची नोंद झाली आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. धुळीस कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारला गेला आहे. त्यामुळे मुंबईतील उडणाऱ्या धुळीचे प्रमाण कमी झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर हवेची गुणवत्ता उत्तम असल्याची माहिती सफर संस्थेने दिली आहे. नागरिकांना वायुप्रदूषणाचा कोणताही धोका नाही. सध्या मुंबईतही समुद्राकडून हवा सुटली असून त्यामुळे धूलिकण वाहून जात असल्याचेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com