मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार ''जनतेशी सुसंवाद'':

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार ''जनतेशी सुसंवाद'':

पालकमंत्री दीपक केसरकर यांचा आजपासून ‘जनतेशी सुसंवाद’
पालिकेच्या विविध प्रभाग कार्यालयांत कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’ आणि ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून १ आणि २ जून रोजी महापालिका वॉर्डांमधील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पालिकेच्या वॉर्ड कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या वॉर्डातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतचे निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
केसरकर गुरुवारी (ता. १) सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान पालिकेच्या ए आणि बी वॉर्डमध्ये जनतेच्या सूचना आणि समस्या ऐकून घेतील. हा कार्यक्रम इंडियन रेडक्रॉस सोसायटी हॉल, १४१, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट या ठिकाणी होईल. शुक्रवारी (ता. २) ‘जी-उत्तर’ आणि ‘जी-दक्षिण’ वॉर्डातील जनतेशी संवाद साधतील. ‘जी-उत्तर’ वॉर्डमधील कार्यक्रम दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान कॉन्फरन्स हॉल जी उत्तर विभाग कार्यालयात होईल. ‘जी दक्षिण वॉर्ड’मधील कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान कॉन्फरन्स हॉल जी दक्षिण विभाग कार्यालयात होईल. ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमास पालकमंत्र्यांसोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय अधिकारी तसेच पालिकेचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com