पुन्हा जे.जे.त जाणार नाही ः डॉ. लहाने

पुन्हा जे.जे.त जाणार नाही ः डॉ. लहाने

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : निवासी डॉक्टरांनी केलेले आरोप खोटे असून त्यामुळे माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे. आता पुन्हा जे जे रुग्णालयात जाणार नाही, अशी भूमिका डॉ. तात्याराव लहाने यांनी घेतली आहे. मी स्वाभिमानी आहे. असे आरोप होणार असतील तर आमचे राजीनामे स्वीकारावेत आणि आम्हाला कार्यमुक्त करावे, असे डॉ. लहाने यांनी म्हटले आहे.

डॉ. लहाने म्हणाले की, गेल्या कित्येक काळापासून गरीब, गरजू, कष्टकरी, तसेच कर्करोगी रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळवून दिली. शस्त्रक्रियांची संख्या पुरस्कारांसाठी वाढवत राहिलो नाही. मात्र, आता सहन होत नाही. आता यापुढे जे. जे. रुग्णालयाशी आपला संबंध राहणार नाही. राज्यात कुठेही शस्त्रक्रिया करण्याचा मला शासनाने अधिकार दिला असून मागे साडे चौदा लाख शस्त्रक्रिया केल्या होत्या. आताही २७ लाख करावयाच्या आहेत. मात्र, असे आरोप होत असतील तर आमचे राजीनामे स्वीकारावेत आणि आम्हाला कार्यमुक्त करा, असे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. ते शुक्रवारी झालेल्या मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून जे. जे. रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. तात्याराव लहाने आणि निवासी डॉक्टर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com