पुर्नमुल्यांकनाचे कामकाज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर

पुर्नमुल्यांकनाचे कामकाज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर

मुंबई, ता. ३ : परीक्षा आणि निकालानंतर विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षांच्या पुनर्मूल्यांकन व छायाचित्रासाठी अनेक महिने विद्यापीठात फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यावर उपाय म्हणून आता विद्यापीठाने यासंदर्भातील सर्व कामकाज, त्यासाठीचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या तसेच संलग्न आणि स्वायत्त महाविद्यालयांना यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पदवी, पदव्युत्तर आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील सात दिवसांत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. लिंक उपलब्ध झाल्यानंतर पुढील बारा दिवसांत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.
पदवीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना ते पूर्णपणे अचूक भरल्याची खात्री करावी. तसेच मिळालेल्या गुणांची यादी, त्याची सॉफ्ट कॉपी, पुनर्मूल्यांकन व छायांकित प्रत परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून ३५ दिवसांच्या आत कलिना संकुलातील छत्रपती‍ शिवाजी महाराज भवन येथे सकाळी ११ ते ३ या वेळात सादर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com