हैदराबादला जाण्याबाबत वर्वरा राव यांना दिलासा नाहीच

हैदराबादला जाण्याबाबत वर्वरा राव यांना दिलासा नाहीच

मुंबई, ता. ५ : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले तेलगू कवी वर्वरा राव यांना हैदराबादमध्ये डोळ्यांच्या उपचारांसाठी जाण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून आज कोणताही दिलासा मिळाला नाही. वर्वरा राव सध्या नवी मुंबईमध्ये वैद्यकीय जामिनावर आहेत.
राव यांना मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी हैदराबादला जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. याचिकेवर न्या. सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. संबंधित अर्जावर एकल न्यायाधीशांपुढे सुनावणी होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. नियमित जामीन याचिकेत सुनावणी करण्याची मागणीही न्यायालयाने अमान्य केली. त्यामुळे राव यांना आता द्विसदस्यीय न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे याचिका दाखल करावी लागेल.

राव यांना २०१८ मध्ये एनआयएने अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर केला असून मुंबई सोडून जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत. तपास यंत्रणेने गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवले असून जामिनाला विरोध केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com