Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

Loksabha Election 2024 : पीयूष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना सक्ती

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कांदिवलीतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांवर कथित सक्ती करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात एका विद्यार्थ्याने व्‍हिडीओ व्‍हायरल करून ओळखपत्र जमा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘मेरा पहला वोट देश के लिए’ या बॅनरखाली निवडणूक सहभागाला चालना देण्यासाठी महाविद्यालयांना जागरूकता मोहीम राबवण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांनी सध्या सुरू असलेल्या विविध प्रकारच्या परीक्षांचा काळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना ‘देशात लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या भाजपचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टराटरा फाडला. विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करून परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित असेल’ अशी टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही या प्रकारावर चिंता व्यक्त केली.

असे पुन्हा होणार नाही : गोयल
राजकीय वादानंतर भारतीय जनता पक्षानेही विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर ध्रुव गोयल यांची प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. एका व्हिडीओमध्ये गोयल म्हणाले, ‘प्रथम मी तुमचे आभार मानू इच्छितो आणि तुमच्या बोलण्याच्या धैर्याबद्दल तुमचे अभिनंदन करू इच्छितो. असे पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन आणि जर तसे झाले तर कृपया मला सांगा,’ असे त्यात म्हटले आहे. तर ठाकूर महाविद्यालयाच्या प्राचार्य चैतली चक्रवर्ती यांनी एक लेखी निवेदन जारी करत त्यात व्हायरल झालेला व्हिडीओ राजकीय हेतूने हेरून प्रसारित करण्यात आला असून हे खेदजनक असल्याचे म्हटले आहे.

Loksabha Election 2024
Mahad News : महाडमध्ये सुरक्षेसाठी दीड कोटी, चोऱ्यांच्‍या घटनात वाढ ; जिल्‍हा गृहनिर्माण महासंघाचा पुढाकार

महाविद्यालयावर कारवाईची मागणी
युवा सेनेनेही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून ठाकूर महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना जबरदस्तीने भाषण ऐकवल्याबद्दल या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com