Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporationsakal

Mumbai Municipal Corporation : नालेसफाईवर ‘सीसीटीव्ही’चा वॉच

कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात मुंबई तुंबत असल्याने पालिकेला मुंबईकराच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नालेसफाईच्या कामावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. कंत्राटदाराकडून नालेसफाई योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे तपासण्यासाठी महापालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.


मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात मुंबई तुंबत असल्याने पालिकेला मुंबईकराच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नालेसफाईच्या कामावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. कंत्राटदाराकडून नालेसफाई योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे तपासण्यासाठी महापालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

यंदा नालेसफाईसाठी पालिका २५० कोटी रुपये खर्च करणार आहे. दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाई सुरू होते. यंदा मात्र मार्चच्या तिसऱ्या आठवड्यानंतर नालेसफाई सुरू झाल्याने नालेसफाईचे उद्दिष्ट साध्य होणे अवघड दिसते आहे. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. नालेसफाई व्यवस्थित झाली नाही तर मात्र अनेक भागांत पाणी साचण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे.

मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याच्या ठिकाणांमध्ये येणारी माती, घाण, कचरा व्यवस्थित स्वच्छ होणे गरजेचे आहे; अन्यथा गाळामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकांचे दिवस असल्याने याचे खापर अधिकाऱ्यांवर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे काही अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.

तीन हजार कॅमेऱ्यांची नजर नालेसफाईच्या कामावर अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे सुरू केले आहे. यातून कोणी सुटू नये, यासाठी सीसीटीव्हीची मदतदेखील घेतली जात आहे. मुंबईत सध्या तीन हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरांची नजर नालेसफाईच्या कामावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com