विकास प्रारूप नियोजनाची कामे रखडली

विकास प्रारूप नियोजनाची कामे रखडली

विकास प्रारूप नियोजनाची कामे रखडली
- स्‍वतंत्र मुख्य अभियंते देण्याची अभियंता संघटनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबई महानगरपालिका विकास नियोजन (डीपी), इमारत प्रस्ताव (बीपी) आणि नगररचना विभागासाठी स्वतंत्र मुख्य अभियंते देण्याची मागणी महापालिका अभियंता संघटनेने केली आहे. आतापर्यंत एकच मुख्य अभियंता तिनही विभागांचे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे शहराच्या विकास नियोजनाच्या कामावर परिणाम होत असल्‍याचे संघटनेचे म्‍हणणे आहे.
२००० मध्ये केलेल्या विकास आराखडा नियोजन २०३४ अंतर्गत एकही काम चार वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. तर विकास नियोजनाअंतर्गत ठरलेली कामे १० वर्षात पूर्ण करायची होती. या विभागात बसलेल्या अधिकाऱ्यांचे संपूर्ण लक्ष शहरात विकसित होत असलेल्या इमारतींवरच आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केले.
सुनील राठोड यांची मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या मुख्य अभियंतापदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे असे चार-पाच अधिकारी आहेत, ज्यांची बदली इतर खात्यात झाल्यानंतर काही काळात ते पुन्हा त्याच विभागात आले. तीन वेगवेगळे विभाग असतानाही संपूर्ण मुंबई शहराच्या विकासाची जबाबदारी एका मुख्य अभियंत्याकडे सोपवण्यात आली आहे. अशा अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी महापालिका अभियंता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
डीपी आणि टीपीसाठी एक मुख्य अभियंता आणि इमारत प्रस्तावासाठी स्वतंत्र मुख्य अभियंता नियुक्त करून कामाला गती देण्याची मागणी होत आहे.

विकास नियोजन आणि इमारत प्रस्ताव या दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता नेमण्याची मागणी आम्ही महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. दोन्ही विभागांसाठी एकच मुख्य अभियंता दिल्याने दोन्ही विभागांच्या कामावर परिणाम होत आहे. महापालिकेने २०२४-२५ या वर्षासाठी दोन लाख कोटी रुपयांच्या कामाचे कार्यादेश जारी केले आहेत. चालू आर्थिक वर्षात १० हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.
- रमेश भुतेकर- ​देशमुख, उपाध्यक्ष, महापालिका अभियंता संघटना
.........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com