पालिका जलाशयासाठी नवीन निविदा

पालिका जलाशयासाठी नवीन निविदा

मुंबई : गोलंदजी हील जलाशयासाठी पाण्याचे दोन पंप बदलण्यासाठी जल अभियंता विभागाद्वारे निविदाप्रक्रिया सुरू आहे; पण या निविदेनुसार सद्य:स्थितीत असलेल्या ३० मीटर क्षमतेचे पंप जलविभाग विकत घेणार होती; परंतु या जलाशयातून भविष्यात एफ दक्षिण विभागात पाणीपुरवठा होणार असल्याने जास्त क्षमतेचे पंप बसवण्यात येणार आहेत. गोलंदजी हील जलाशयातून एफ दक्षिण विभागातील प्रभाग क्रमांक २०१, २०२, २०३, २०४, २०५,२०६ आदी प्रभागांना पाणीपुरवठा केला जातो. या परिसरात येत असलेल्या नायगाव विभागातील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम म्हाडाच्या वतीने चालू आहे. या ठिकाणी असलेल्या हजारो रहिवाशांचे पुनर्विकास झाल्यावर ५०० फुटाची सदनिका दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे इतर प्रभागांत झोपडपट्ट्यांचे एसआरएमार्फत पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची मागणी वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com