

मुंबई : दारूच्या नशेत तरुणाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी वृद्ध सुरक्षा रक्षाकाचा गुरुवारी मृत्यू झाला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी विशाल गावडे नामक जीम ट्रेनरला अटक केली.
पाच वर्षांपासून सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या शिवाजी बारवे (६०) यांनी बुधवारी रात्री दारूच्या नशेत सोसायटीत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशाल गावडेला रोखले होते. त्यावरून रागाच्या भरात आरोपीने बारवे यांचे डोके भिंतीवर आपटले. रक्तबंबाळ असतानाही आरोपीने बारवे यांना मारहाण केली होती. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, गावडे पूर्वी या सोसायटीत ट्रेनर म्हणून काम करत होते. तेथून त्यांनी अन्य ठिकाणी नोकरी सुरू केली, पण बुधवारी सहजच ते सोसायटीत आल्याची माहिती प्राथमिक तपासातून पोलिसांच्या हाती लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.