काँग्रेस मानसिक दिवाळखोर झालीय : संजय निरुपम

काँग्रेस मानसिक दिवाळखोर झालीय : संजय निरुपम
Published on

काँग्रेस मानसिक दिवाळखोर झालीय : संजय निरुपम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : एकामागून एक निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याने काँग्रेस मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झाल्याची टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी बुधवारी (ता.९) केली. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त केला, त्यावर निरुपम यांनी सडकून टीका केली.

निरुपम म्हणाले की, ‘भारतीय मतदारांचा विश्वास संपादन करण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे निवडणूक निकालांवर संशय व्यक्त करणे, ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत. काँग्रेसच्या विरोधात मतदान होत असून, तिथे भाजप, शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आहेत. महाराष्ट्र, हरियाना, दिल्लीमध्ये अलीकडे झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीला नाकारले. सातत्याने पराभव होत असल्याने काँग्रेस नेते आता निवडणूक प्रक्रियेवर खापर फोडत आहेत. गडबड निवडणूक प्रक्रियेत नसून तुमच्या मानसिकतेमध्ये आहेत. यातून काँग्रेस नेत्यांची मानसिक दिवाळखोरी दिसून येत आहे.’ अशी टीका निरुपम यांनी केली. ‘निवडणुकांमध्ये कोणतीही गडबड झालेली नाही; हे सत्य काँग्रेस नेत्यांनी आणि राहुल गांधीनी आता स्वीकारायला हवे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा पराभवाचे विश्लेषण करायला हवे’, असा टोला निरुपम यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com