बच्चू कडू यांच्या आंदोलननिमित्त प्रहारची मंत्रालयावर धडक

बच्चू कडू यांच्या आंदोलननिमित्त
प्रहारची मंत्रालयावर धडक
Published on

बच्चू कडू यांच्या आंदोलनानिमित्त
प्रहारची मंत्रालयावर धडक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी ८ जूनपासून मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यास पाठिंबा म्हणून मुंबईत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुधवारी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले.
दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभावावर २० टक्के अनुदान, युवकांच्या हाताला काम अन्यथा सन्मानजनक दाम द्यावे, सरकारी नोकऱ्यांतील रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात यांसह विविध १५ मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयापुढे आंदोलन केले. अचानक कार्यकर्ते जमल्याने पोलिसांचीही धावपळ झाली. त्यांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेतले.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com