दादर येथे महिलेची आत्महत्या
दादर येथे महिलेची आत्महत्या
मुंबई : दादर येथे इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. २७) मध्यरात्री केळुसकर मार्गावरील सुप्रभात इमारतीत घडली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव कमला अग्निहोत्री असे होते. त्या पतीसोबत इमारतीच्या सातव्या मजल्यावर वास्तव्यास होत्या. घरातील गॅलरीतून त्यांनी खाली उडी घेतल्याचा अंदाज आहे. पती केशव यांनी दिलेल्या जबाबानुसार कमला नैराश्येच्या गर्तेत होत्या. माहीम येथील डॉक्टरकडे त्यांचे उपचार सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

