

अभिनेता रणवीर सिंगला
बिश्नोई टोळीची धमकी?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्यानंतर आता अभिनेता रणवीर सिंगलाही व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे धमकी प्राप्त झाल्याचे मंगळवारी पोलिसांनी सांगितले. ही बाब रणवीर वास्तव्यास असलेल्या मध्य मुंबईतील गृहसंकुलाच्या व्यवस्थापकीय समितीमुळे उघड झाली. समितीने मंगळवारी स्थानिक पोलिस ठाणे गाठून रणवीर, दीपिका पादुकोण यांनी ठेवलेल्या खासगी सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि पोलिस गणवेशातील व्यक्तींच्या गृहसंकुलातील वावराने अन्य रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे, अशी लेखी तक्रार दिली. ही धमकी बहुधा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
हे सुरक्षा रक्षक आपण नेमले आहेत का, वर्दीतील अधिकारी पोलिस आहेत का? अशी प्रश्नावली या समितीने लेखी तक्रारीत नमूद केली. दरम्यान, याबाबत विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी रणवीरला धमकी प्राप्त झाली होती. त्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रणवीरच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, त्यालाही सुरक्षा पुरविण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.