रेल्वे इंजिनने सिग्नल ओलांडला

रेल्वे इंजिनने सिग्नल ओलांडला
Published on

रेल्वे इंजिनने सिग्नल ओलांडला
सीएसएमटी येथील घटना; गाड्या रखडल्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे गुरुवारी सकाळी शटिंगसाठी नेण्यात येणाऱ्या रेल्वे इंजिनने सिग्नल ओलांडल्याची गंभीर घटना घडली. या प्रकारामुळे ‘अप थ्रू’ जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळित होऊन सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठा फटका बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे शटिंग करून घेऊन जाणारे इंजिन सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ११वरून १४कडे हलविण्यात येत होते. याचदरम्यान इंजिनने सिग्नल ओलांडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ जलद मार्गावरील वाहतूक थांबवावी लागली. परिणामी, सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद लोकल गाड्या विविध स्थानकांदरम्यान अडकून राहिल्या. या घटनेचा सर्वाधिक परिणाम कल्याण दिशेने जाणाऱ्या प्रवाशांवर झाला. अनेक गाड्या वेळापत्रकापेक्षा उशिरा धावल्याने कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या नोकरदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढल्याचेही चित्र दिसून आले. सकाळी ७.२० वाजता वाहतूक सुरळीत झाली.
...
चौकशी होणार
मध्य रेल्वेने या घटनेची दखल घेतली असून सिग्नल ओलांडण्यामागील नेमके कारण काय, याची चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com