२७ वर्षांनंतर खबऱ्याची हत्या

२७ वर्षांनंतर 
खबऱ्याची हत्या
Published on

२७ वर्षांनंतर
खबऱ्याची हत्या

मुंबई, ता. २५ : शहरात तब्बल २७ वर्षांपूर्वी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या गँगस्टर सादिक कालियाच्या पुतण्याने साथीदाराच्या मदतीने संशयित खबऱ्याची निर्घृण हत्या केली. नागपाडा भागात नुकतीच ही घटना घडली असून, याप्रकरणी दोघांना नागपुरातून अटक करण्यात आली. इक्बाल इब्राहिम सेलिया (७८) असे मृताचे नाव आहे. इक्बाल हे घरी एकटेच असताना संध्याकाळी आरोपी सादिक जावर (वय २९) आणि नौशाद मिठानी त्यांच्या घरात घुसले. त्यांच्यावर चाकूने २० हून अधिक वार करून त्यांनी इक्बाल यांची हत्या केली. पत्नी आणि मुलगा घरी परतल्यावर ते रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी जावरच्या काकांचा १९९९ मध्ये पोलिसांकडून एन्काउंटर झाला होता. इक्बाल यांनीच काकांची माहिती पोलिसांना दिल्याचा जावरला संशय होता. पोलिस चौकशीत या दोघांनी गुन्हा कबूल केला. याप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com