फेडरल बँकेकडून स्टँडर्ड चार्टर्डबँकेच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओचे अधिग्रहण

फेडरल बँकेकडून स्टँडर्ड चार्टर्डबँकेच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओचे अधिग्रहण
Published on

फेडरल बँकेकडून स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओचे अधिग्रहण

मुंबई, ता. ६ : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे भारतातील निवडक ‘क्रेडिट कार्ड भांडार’ (ग्राहकसंच) अधिग्रहित करण्यास फेडरल बँकेने सहमती दर्शविली असून त्यांच्यात यासंदर्भातील करारावर लवकरच स्वाक्षरी होईल. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, फेडरल बँकेचा क्रेडिट कार्ड ग्राहकवर्ग विस्तारला जाईल. यामुळे उच्च दर्जाचा त्याचबरोबर अनुभवी ग्राहकवर्ग जोडला गेल्याने प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये फेडरल बँकेचा ग्राहकविस्तार होईल. या व्यवहारामुळे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला भारतातील संपत्ती व्यवस्थापन आणि श्रीमंत, उच्च उत्पन्न गट या विभागांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.

फेडरल बँकेतर्फे अधिग्रहण केल्या जाणाऱ्या या भांडारात सुमारे ४.५ लाख क्रेडिट कार्ड्सचा समावेश आहे. फेडरल बँकेकडे सध्या स्वतःची आठ लाख ‘नॉन-को-ब्रँडेड’ कार्ड आणि १३ लाख ‘को-ब्रँडेड’ कार्ड असा ग्राहकसंच आहे. या अधिग्रहणामुळे  फेडरल बँकेच्या ‘नॉन-को-ब्रँडेड’ क्रेडिट कार्ड्सवरील थकीत रकमेत अंदाजे ९० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. कार्ड्सची नेमकी संख्या ही प्रत्यक्ष हस्तांतरणाची वेळ आणि संबंधित ग्राहकांची संमती यावर अवलंबून असेल. या व्यवहारासाठी फेडरल बँक जी अंतिम रक्कम देईल, ती हस्तांतरणाच्या वेळी कार्ड्सवर असलेल्या प्रत्यक्ष थकीत रकमेवर आधारित असेल. अधिग्रहण करण्यात येणाऱ्या कार्ड ग्राहकांपैकी सुमारे ७५ टक्के  ग्राहक भारतातील पहिल्या आठ प्रमुख शहरांमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे या प्रमुख शहरांमधील फेडरल बँकेची उपस्थिती दुप्पट होईल. या व्यवहारामुळे मोठ्या मेट्रो बाजारपेठेतील बँकेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढेल. तसेच मोठ्या शहरातील आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या ग्राहकांपर्यंत बँक अधिक प्रमाणात पोहोचेल, असे फेडरल बँकेचे एमडी आणि सीईओ के. व्ही. एस. मनियन यांनी सांगितले. हा व्यवहार यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com