

गोल्डन टेम्पल मेल वांद्रे टर्मिनसवरूनच धावणार
मुंबई : पश्चिम रेल्वेने गोल्डन टेम्पल मेलच्या स्थानक बदलाची तात्पुरती व्यवस्था आणखी सहा महिन्यांसाठी वाढवली आहे. या मुदतवाढीमुळे ही गाडी १७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरूनच धावणार आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. १२९०३ मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल मेल १७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून सुटेल. तसेच गाडी क्र. १२९०४ अमृतसर–मुंबई सेंट्रल गोल्डन टेम्पल मेल १५ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.