

आरोपी गुन्हा कबूल करण्यास तयार
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रेस्थित निवासस्थानी जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणात बांगलादेशी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामने शुक्रवारी (ता. २८) सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून गुन्हा कबूल करण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याच वेळी न्यायालयाकडे दयेची याचनाही केली.
घटनेनंतर दोन दिवसांनी अटक केलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लाम न्यायालयीन कोठडीत असून शरीफुलने गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवणारा अर्ज न्यायालयात केला आहे, या अर्जात त्याने न्यायालयाकडे दयेची विनंती केली आहे. न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेऊन राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन सुनावणी ११ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. शरीफुलवर दरोडा घालण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राचा वापर करणे, गंभीर दुखापत करणे, यांसारख्या भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांतर्गत, तसेच परदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट अधिनियमांतील संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. देशमुख यांनी शरीफुल याच्यावर आरोप निश्चित केले होते. त्यामुळे त्याच्यावरील खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.