‘मनुस्मृती’च्या प्रती जाळून आंदोलन

‘मनुस्मृती’च्या प्रती जाळून आंदोलन
Published on

‘मनुस्मृती’च्या प्रती जाळून आंदोलन
युवा काँग्रेसकडून भाजप, आरएसएसचा निषेध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुंबई युवा काँग्रेसने सोमवारी दादर येथे आंदोलन केले. मुंबई युवा काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी ‘मनुस्मृती’च्या प्रती जाळून भाजप, आरएसएसच्या कथित मनुवादी आणि जातीयवादी मानसिकतेचा निषेध केला.
कार्यकर्त्यांनी या वेळी भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा असल्याची टीका झीनत शबरीन यांनी केली. हा प्रकार केवळ खर्गे यांचा अपमान नसून देशातील दलित, वंचित आणि शोषित समाजाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला विरोध करणे ही युवक काँग्रेसची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात मनुवादी विचारसरणीला स्थान नसल्याचे शबरीन यांनी सांगितले. संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी आणि सामाजिक समतेसाठी युवक काँग्रेसकडून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
...
यांचा सहभाग
आंदोलनात मुंबई युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसैन शेख, महासचिव आसिफ खान, संतोष गुप्ता, ईशान्य मुंबई अध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण-मध्य मुंबई अध्यक्ष प्रज्ञा ढवळे, उत्तर मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष अजयकुमार मिश्रा, उत्तर-पश्चिम मुंबई अध्यक्ष शिव यादव, कार्यकारी अध्यक्ष अब्दुल समद यांच्यासह प्रदेश, जिल्हा आणि विधानसभा स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com