म्हाडा संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांचा सचिन अहिर यांच्याकडून आढावा

म्हाडा संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांचा  सचिन अहिर यांच्याकडून आढावा
Published on

नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढा
विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : म्हाडा प्राधिकरणाशी संबंधित विविध गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्वसन आणि पुनर्विकासाच्या प्रश्नांबाबत विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी बुधवारी विधान भवन येथे आढावा घेतला. या वेळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासह मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्थांच्या प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांचे म्हणणे ऐकून सकारात्मक मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत लॉटरीद्वारे होणाऱ्या घरवाटपातील अडचणी, वरळी बीडीडी चाळीतील संबंधित कुटुंबांना पर्यायी निवास आणि संक्रमण शिबिरातील नागरिकांच्या मागण्या यावर या वेळी चर्चा झाली. तसेच लोअर परळ येथील सरस्वती बिल्डिंगमधील दहा रहिवाशांना पर्यायी सदनिका देणे आणि ना. म. जोशी मार्गावरील ३६५, शिवशक्ती पार्क येथील तानवडे व अन्य ३० रहिवाशांच्या निवेदनावर चर्चा झाली. तसेच भायखळा येथील गीतांजली बिल्डिंगचा पाच म्हाडा इमारतींच्या क्लस्टरमध्ये समावेश करणे, एसव्हीपीनगर सोसायटीतील एचआयजी आणि एलआयजी पुनर्वसन, टागोरनगरमधील घरकुल सोसायटीच्या कुटुंबांना कायमस्वरूपी मालकी हक्क देणे, अभ्युदयनगरमधील इमारतींचे पुनर्विकास, रुस्तम ताडीवाला चाळ तसेच शाहसदन सोसायटीशी संबंधित निवेदनांवरही चर्चा झाली. या बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com