राजकीय सभांनाही यापुढे आक्षेप घ्याल!

राजकीय सभांनाही 
यापुढे आक्षेप घ्याल!
Published on: 

राजकीय सभांनाही यापुढे आक्षेप घ्याल!

जावेद अख्तरांचा रहिवाशांना टोला

सीजेपी आंदोलनाचा वाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्राेच जनता पार्टीने शुक्रवारी शिवाजी पार्क येथे आंदोलन केले. या वेळी आंदोलनामुळे ध्वनिप्रदूषण, गर्दी आणि दैनंदिन व्यवहारांत अडथळे निर्माण होत असल्याचा आक्षेप स्थानिक रहिवाशांनी घेतला. त्याबाबत प्रतिक्रिया देताना यापुढे राजकीय सभांनाही आक्षेप घ्याल याची खात्री आहे, असा उपरोधिक टोला जावेद अख्तर यांनी रहिवाशांना लागावला.

सायंकाळी ४च्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनाला हजारो नागरिकांची उपस्थिती होती. पोलिसांची परवानगी नसतानाही आंदोलन झाल्याचे सांगण्यात आले. काही दुकाने व आस्थापने गर्दीमुळे बंद ठेवावी लागल्याचा दावा रहिवाशांनी केला. नागरिकांनी आंदोलनाच्या अधिकाराला विरोध नसून, नियमांचे पालन करून शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची मागणी केली.

रहिवाशांच्या विरोधावर ज्येष्ठ लेखक-गीतकार जावेद अख्तर यांनी ‘एक्स’वर उपरोधिक भाष्य केले. शिवाजी पार्कमधील आंदोलनामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात रहिवाशांनी आवाज उठविला, याबद्दल आनंद असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रातील एखाद्या राजकीय पक्षाने याच मैदानावर सभा घेतली, तरी रहिवासी याच तीव्रतेने आक्षेप घेतील, अशी ‘शंभर टक्के खात्री’ असल्याचे त्यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com