मुंबई-बंगळुरू प्रवास आता १६ तासांत

मुंबई-बंगळुरू प्रवास आता १६ तासांत
Published on: 

मुंबई-बंगळूर प्रवास आता १६ तासांत
स्लीपर वंदे भारत याच महिन्यात धावण्याची शक्यता; पुणे, सोलापूरमार्गे १,१३७ किमीचा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई-बंगळूर रेल्वे प्रवासाचा कालावधी लवकरच आठ तासांनी कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि बंगळूरदरम्यान स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची तयारी सुरू असून, प्रस्तावित वेळापत्रकानुसार ही गाडी सुमारे १,१३७ किलोमीटरचे अंतर १५ ते १६ तासांत पार करणार आहे. ही सेवा याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
प्रस्तावित स्लीपर वंदे भारत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, रायचूर, गुंतकल, अनंतपूर आणि धर्मावरममार्गे केएसआर बंगळूर येथे पोहोचणार आहे. बंगळूरहून मुंबईकडे येताना या गाडीला सुमारे १६ तास ५ मिनिटे, तर मुंबईहून बंगळूरकडे जाताना सुमारे १५ तास ४५ मिनिटे लागण्याचे प्रस्तावित आहे.

रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर डबे
मुंबई-बंगळूर हा लांब पल्ल्याचा मार्ग असल्याने रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देत या गाडीची रचना करण्यात आली आहे. प्रस्तावित १६ डब्यांच्या रेकमध्ये ११ थ्री-टियर एसी, चार टू-टियर एसी आणि एक फर्स्ट एसी डबा असणार आहे. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा चालविण्याचा प्रस्ताव असून, सोमवारी गाडी बंद राहण्याची शक्यता आहे.

१३० किमी प्रतितास वेगाची क्षमता
मुंबई-बंगळूर मार्गाची लांबी १,१३७ किलोमीटर असून, बहुतांश मार्ग दुहेरी आणि विद्युतीकृत आहे. या मार्गावरील बहुतांश भागात ताशी १३० किलोमीटर वेगाने गाडी चालविण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्याच्या सेवांच्या तुलनेत प्रवासाचा कालावधी कमी करण्यास या सेवेमुळे मदत होणार आहे.

अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा
प्रस्तावित गाडीचे क्रमांक २७६५१ आणि २७६५२ असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, गाडीचे क्रमांक, थांबे, वेळापत्रक आणि सुरू होण्याची तारीख याबाबत रेल्वेकडून अंतिम घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध माहिती प्रस्तावित स्वरूपातील आहे.

११ स्थानकांवर थांबा
सीएसएमटी-कल्याण-पुणे-सोलापूर-कलबुर्गी-वाडी-रायचूर-गुंतकल-अनंतपूर-धर्मावरम-केएसआर बंगळूर

अंदाजित भाडे
- थ्री-टियर एसी : २,२०० ते २,५०० रु.
- टू-टियर एसी : ३,२०० ते ३,६०० रु.
- फर्स्ट एसी : ४,००० ते ४,५०० रु.

मुंबई-बंगळूर स्लीपर वंदे भारत
- अंतर : १,१३७ किमी
- प्रवास कालावधी : १५ तास ४५ मिनिटे ते १६ तास ५ मिनिटे
- डबे : १६
- सेवा : आठवड्यातून सहा दिवस
- साप्ताहिक सुट्टी : सोमवार
- प्रस्तावित मार्ग : पुणे, सोलापूरमार्गे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com