तब्बल १० वर्षांनी रंगला शर्यतींचा थरार!

तब्बल १० वर्षांनी रंगला शर्यतींचा थरार!

मेघराज जाधव, मुरूड
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यात आल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी मुरूड समुद्राकिनारी शुक्रवारी (ता. २४) शिवसेना मुरूड शहर शाखेच्या वतीने घोडागाडी, सायकल, घोडेस्वार व बैलगाडी शर्यतीचा थरार शौकिनांना अनुभवता आला.
रायगड जिल्ह्यासह तालुक्यातून या स्पर्धांसाठी १० सायकलस्वार, सहा घोडेस्वार, १० घोडागाडी आणि ८० बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धांचे उद्‍घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. स्पर्धांमध्ये सर्वप्रथम सायकलस्वारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ३२ इंच स्मार्ट एलसीडी, द्वितीय ब्ल्यू स्टार कुलर, तृतीय क्रमांकासाठी स्मार्ट वॉच बक्षीसे देण्यात आली. बैलगाडीच्या थरार स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी नांदगाव येथील अमोल कोतवाल प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकाचा मानकरी काशिदचा परवेश बेलोसे, तृतीय क्रमांकाचा मानकरी अलिबाग किहीमचा वामन पडवळ ठरले. या विजेत्यांना आमदार महेंद्र दळवी व मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या वेळी मुरूड अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई, शिवसेना नेते विलास सुर्वे, युवा नेते सागर चौलकर, शहरप्रमुख संदीप पाटील, वीरेंद्र भगत, शरद खेडेकर, अशोक धुमाळ, महेश भगत, विजय पाटील, पांडुरंग आरेकर, श्रीकांत सुर्वे, रूपेश रणदिवे, सुनील शहा, महेंद्र भाटकर, श्रीकांत खोत, तुषार कारभारी, दिनेश मिणमिणे, दिपेश वरणकर उपस्थित होते.

बक्षिसांची खैरात
घोडेस्वार स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ब्ल्यू स्टार कुलर, द्वितीय टेबल फॅन, तृतीय क्रमांकास स्मार्ट वॉच बक्षिसे देण्यात आली. सर्वगटासाठी चार गट प्रथम क्रमांकासाठी ड्रेसिंग टेबल, द्वितीय क्रमांक टेबल फॅन, तृतीयला स्मार्ट वॉच बक्षिसे देण्यात आली. अंतिम गट प्रथम क्रमांकासाठी हिरो होंडा, सी.डी. डिलक्स, द्वितीय क्रमांकासाठी डबल डोअर फ्रीज, तृतीयला सिंगल डोअर फ्रीज देण्यात आले. अंतिम गट दोन प्रथम क्रमांकासाठी डबल डोअर फ्रीज, द्वितीय क्रमांकासाठी ४० इंच स्मार्ट एलसीडी, तृतीयला वॉशिंग मशीन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com