मुरूडमध्ये मेळव्यात १,८९५ जणांना नोकरी

मुरूडमध्ये मेळव्यात १,८९५ जणांना नोकरी

मुरूड, ता. ११ (बातमीदार) ः अलिबागपाठोपाठ मुरूडमधील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित मेळाव्यात हजारो तरुण-तरुणींनी हजेरी लावली. यात १,८९५ जणांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी प्रवेश मिळवला. तर ५५४ जणांना थेट नोकरी मिळाल्‍याची माहिती आयोजक अजित कासार यांनी दिली.
रोजगार मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी माजी आमदार पंडित पाटील, मेळाव्याच्या संयोजिका चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस मनोज भगत, राज्‍य मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय गिदी, जिल्‍हा परिषद सदस्य नम्रता कासार, प्राचार्य डॉ . नगर बाबडी, प्रा. विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याची ओळख औद्योगिक जिल्हा अशी असली तरी सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, या साठी शेकापने पुढाकार घेऊन ५० नामवंत कंपन्यांना मेळाव्यात आमंत्रित केले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये अभियोग्यता आहे, त्यांनी आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जावे, असे मार्गदर्शन चित्रलेखा पाटील यांनी केले.

मुंबई, पुणे या शहरांकडे जाणारा युवकांचा लोंढे थांबविण्याचा, रायगडचा शैक्षणिक विकास करण्याचा शेकापचा प्रयत्‍न आहे. बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यापेक्षा रोजगार मेळावा कधीही चांगला. आगरदांडा येथील अदाणी उद्योग समूहात स्‍थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्‍नशील आहोत.
- पंडित पाटील, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com