लंगुर जातीच्या माकडीणीचा भरधाव वाहनाच्या धडकेने मृत्यू

लंगुर जातीच्या माकडीणीचा भरधाव वाहनाच्या धडकेने मृत्यू

मुरूड, ता. ३० (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील मिठागर-भालगाव रस्त्यावर लंगुर जातीची माकडीण तिच्या पिल्लासह रस्ता ओलांडत होती. या वेळी अज्ञात वाहनाची धडक लागल्‍याने तिचा जागीच मृत्यू झाला; तर तिचे पिल्लू काही तासांनी मरण पावले. मिठागर-भालगाव रस्त्यालगतच्या डोंगरावर लंगूर जातीची माकडे खाद्याच्या शोधात रस्त्यावर नेहमीच ये-जा करीत असतात. त्यापैकी माकडीण व तिच्‍या पिल्लाला रस्ता ओलांडताना अज्ञात गाडीने ठोकरल्याने माकडीणीचा जागेवरच मृत्यू झाला. या वेळी तेथून प्रवास करणारे डोंबिवली येथील मनोज कुलकर्णी यांनी घटनास्थळी थांबून पिल्लाला पाणी पाजले; मात्र ते काही तासांनी मरण पावले. ही वार्ता मुरूड शहरातील सर्पमित्र संदीप घरत यांना मिळताच मुरूडचे पोलिस नाईक सागर रसाळ, वनविभाग अधिकारी दिनेश रोटकर हे अपघातस्थळी दाखल झाले. त्‍यांनी पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com