Salav - Murud
Salav - Murud sakal

Road News: साळाव -मुरुड रस्त्याची दुरवस्‍था, ग्रामस्‍थांसह पर्यटक नाराज; काम संथगतीने!

Murud News: साळाव- मुरूड रस्‍ता गेल्‍या काही महिन्‍यांपासून अत्‍यंत खराब स्‍थितीत असल्‍याने वाहनचालकांसह ग्रामस्‍थ त्रस्‍त झाले आहेत.

या रस्‍त्‍याची लवकरात लवकर दुरुस्‍ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे. या रस्‍त्‍यासाठी निधीची तरतूद झाली आहे.

Salav - Murud
Murud Sea: मुरूडचा समुद्र किनारा होणार एकदम चकाचक ; पर्यटकांना घेता येणार आनंद

मात्र पहिल्‍या टप्‍प्‍यातील काम अत्‍यंत संथगतीने सुरू असल्‍याने ग्रामस्‍थांकडून रोष व्‍यक्‍त करण्यात येत आहे.


सध्या अलिबाग, मुरूडमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर पुणे, मुंबई, ठाणे येथून पर्यटक येत असतात. मात्र येथील अंतर्गत रस्‍त्‍यासह प्रमुख रस्‍त्‍यांची अत्‍यंत दयनीय अवस्‍था झाल्‍याने पर्यटकांसह ग्रामस्‍थांना त्रास सोसावा लागत आहे.

गेल्‍या काही महिन्‍यांपासून साळाव-मुरूड रस्‍त्‍याची अत्‍यंत दुरवस्‍था झाली आहे. त्‍यामुळे या रस्‍त्‍याची डागडुजी करावी, यासाठी मुरूड तालुक्यातील नागरिकांची गेल्‍या अनेक दिवसांपासून मागणी आहे. याचा थेट फटका येथील पर्यटन व्‍यवसायावर होत आहे.

Salav - Murud
Mumbai: बेकायदा पोस्टर्स, बॅनरबाजी लावणा-या ४१० जणांविरोधात गुन्हे दाखल

त्‍यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून अर्थसंकल्पातून विशेष ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्‍यातून रस्त्याचा पहिला टप्पा बोर्ली ते साळावचे काम सुरू ही झाले आहे.

परंतु हे काम अपेक्षित गतीने होत नसल्याने स्थानिकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यातूनच विहूर ते माजगाव हा रस्ता खूपच खराब व खड्डेमय झाला आहे.

काशीद ते बोर्लीपर्यंत खराब रस्‍ता असल्‍याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. शिवाय रस्ता लवकर होत नसल्याने स्थानिकांसह पर्यटकांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत आहे.

Salav - Murud
Navi Mumbai: आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; मनपाने घेतला पाच उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय

कमीत कमी आठ दिवसाच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्‍यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

साळाव -मुरूड रस्त्यासाठी अडीच-अडीच किलोमीटरचे टप्पे तयार करण्यात आले असून त्याप्रमाणे हे काम पूर्ण होणार आहे.

लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहे.


- उमेश राठोड, कनिष्ठ अभियंता, मुरूड सार्वजनिक बांधकाम विभाग

Salav - Murud
Mumbai News: डेंग्‍यूचा डास आढळल्‍यास मनपा करणार कडक कारवाई!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com