मुख्यमंत्र्यांकडून तितिक्षा फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांकडून तितिक्षा फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक
मुख्यमंत्र्यांकडून तितिक्षा फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक

मुख्यमंत्र्यांकडून तितिक्षा फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २ (बातमीदार) : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या प्रदेश विद्यार्थी विभागाच्या सहसंयोजिका पायल कबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तितीक्षा फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या कार्याची माहिती पायल कबरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी फाऊंडेशनच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली आणि फाऊंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांना शुभेच्छा दिल्या.