भूगोल उपक्रमाचे अमर कोरमध्ये सादरीकरण

भूगोल उपक्रमाचे अमर कोरमध्ये सादरीकरण

मुलुंड, ता. ५ (बातमीदार) ः अमरकोर विद्यालय भांडुप येथे मंगळवारी (ता. ३) भूगोल उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. लाल बहादूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मारुती नारायण म्हात्रे यांनी या उपक्रमाचे उद्‌घाटन केले. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या वेळी भौगोलिक माहितीचे सादरीकरण उत्तमरीत्या केले. याअंतर्गत दळणवळण, संदेशवहन वाहतूक, ऊर्जा साधने, महासागराचे महत्त्‍व, मानवी संशोधने आणि त्यांचे महत्त्‍व भूमी उपयोजन लोकसंख्या पर्यटन तसेच भारत आणि ब्राझील या देशांतील माहितीचे सादरकरण या वेळी करण्यात आले. या सर्व माहितीचे संकलन इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आले भूगोल सादरीकरांसाठी पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशनचा वापर करण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. याप्रसंगी संस्थेचे सचिव जीवन म्हात्रे, संस्थेचे सभासद सत्यवान गावकर, शैलजा ठाकूर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक साईनाथ हांडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय पवार, पर्यवेक्षिका संगीता मोरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com