तपासणी शिबिराचे आयोजन

तपासणी शिबिराचे आयोजन

ठाणे, ता. ५ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील मानिवली गावामध्ये कल्याण पश्चिमेतील अचिव्हर्स महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेने २६ डिसेंबर ते १ जानेवारी कालावधीत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या निवासी शिबिरात ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी या गावात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पथनाट्याचे सादरीकरण केले. गावकऱ्यांसाठी दोन शौचालय बांधत त्यांची रंगरंगोटीही करण्यात आली. या शिबिरामध्ये योगासने, प्राणायाम, श्रमदान, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आदी कार्यक्रम घेण्यात आले. या सात दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारची व्याख्याने घेण्यात आली. या शिबिरात मराठी लोककवी प्रशांत मोरे, कवी आणि विनोदी कलाकार योगेश मिश्रा, समाजसेविका डॉ. रुपिंदर कौर मुर्जानी आणि आरएसपी कमांडर डॉ. मणिलाल शिंपी, जिल्हा समन्वयक जीवन विचारे यांनी विविध विषयांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मानिवली गावच्या सरपंच सुकन्या गायकर, उपसरपंच चंद्रकांत गायकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी गायकर व महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. महेश भिवंडीकर, प्राचार्या सोफिया डिसोझा, उपप्राचार्या सना खान, एनएसएस कार्यक्रम अधिकारी राजेशकुमार यादव, नेहा त्रिपाठी, करिष्मा थळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com