२५० कोटींची वसईत करवसुली

२५० कोटींची वसईत करवसुली

विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने मालमत्ता कराचा २५० कोटींचा टप्पा नुकताच पार केला आहे. या पूर्वी पालिकेने फेब्रुवारीमध्ये हा टप्पा पार केला होता. मालमत्ता करधारकांना मागील आठ दिवसांपासून २ टक्के शास्ती लागू झाली असून दुसरीकडे वसुलीची कारवाई आता सरसकट सर्वच करधारकांकडून करण्यात येत आहे; तर महापालिकेने २,५०० इतक्या मालमत्ता सील केल्या होत्या. त्यामुळे पालिकेने जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच २५० कोटींचा मालमत्ता कराचा टप्पा पार केला आहे. तसेच महापालिकेकडून थकबाकीदारांवर मालमत्ता सील करणे, नळजोडण्या खंडित करणे अशी कारवाई केली जात आहे. ही कारवाई टाळण्यासाठी पालिकेने मालमत्ता कर भरण्याचे आवाहन थकबाकीधारकांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com