खारघरवासी धावणार ‘व्यसनमुक्तीसाठी’

खारघरवासी धावणार ‘व्यसनमुक्तीसाठी’

खारघर, ता. १० (बातमीदार) : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनच्या ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे घोषवाक्य घेऊन खारघर मॅरेथॉन भरवण्यात आली आहे. २२ जानेवारीला खारघर, सेक्टर १९ येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सुरुवात होणार असून त्याच ठिकाणी पारितोषिकांचे वितरणही होणार आहे.
माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृहनेते व स्पर्धाप्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. २००६ सालापासून पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने खारघरमध्येही या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. या माध्यमातून नेहमी सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्पर्धा ‘रन अगेंस्ट एडस’, ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी’, ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी’, ‘रन फोर निर्भय भारत’, ‘सद्भावना दौड’, ‘एक धाव पाणीबचतीसाठी’, ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’, ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी’, ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन’, ‘हम फिट तो इंडिया फिट’ अशी घोषवाक्य घेऊन झाल्या आहेत.
------------------------------------------
स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग नोंदणी अनिवार्य आहे. तसेच नाव नोंदणी संकेतस्थळ (www.khargharmarathon.in), ७७५७०००००० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.
- परेश ठाकूर, माजी सभागृह नेते, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com